महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

fire in firozabad घरात लागलेल्या आगीत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू - UP home fire six deaths

फिरोजाबादमधील पदम गावात मंगळवारी रात्री उशिरा एका घरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला ( UP home fire six deaths ) आहे.

fire
fire

By

Published : Nov 30, 2022, 9:26 AM IST

फिरोजाबाद : जसराणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदम गावात मंगळवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाच्या 18 गाड्यांनी तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच डीएमने रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना घडली तेव्हा घरात नऊ जण उपस्थित होते. बचावकार्यातून तिघांना वाचवण्यात यश आले. सीएम योगी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

घरात लागलेल्या आगीत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू

जसराणा येथील पदम गावात रमण प्रकाश यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. शोरूमच्या अगदी वर रमण कुटुंबासह राहत होता. एसएसपी आशिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमण यांच्या फर्निचरच्या दुकानात मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. माहिती मिळताच आग विझवण्यासाठी फिरोजाबाद तसेच आग्रा आणि मैनपुरी येथून अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आगीमुळे नऊ जण आत अडकले होते. अडीच ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणता आली. तोपर्यंत घरात अडकलेल्या ६ जणांचा जिवंत जाळल्यामुळे मृत्यू झाला होता. तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details