नवी दिल्ली: उत्तर दिल्लीतील मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटरला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. कोचिंगमध्ये वर्ग सुरू असताना आणि शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिकत असताना ही आग लागली. आगीची माहिती मिळताच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी मुला-मुलींनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरच्या खिडकीतून दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्यास सुरुवात केली.
शॉर्ट सर्किटमुळे आग:कोचिंग सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आणि तारांना आग लागल्याची माहिती मिळताच सीएटीएस रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वृत्त लिहेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. मदत बचाव कार्य सुरू आहे. सध्या यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मुखर्जी नगर येथील 'संस्कृती' कोचिंग सेंटर तिसऱ्या मजल्यावर असून इतर दिवसांप्रमाणे येथेही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासासाठी येत होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे.
धुरामुळे गुदमरले प्राण: सर्व मुले सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मुखर्जी नगरचा परिसर जिथे हे कोचिंग सेंटर आहे तो खूप वर्दळीचा आहे. त्यामुळे गोंधळ उडाला. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर धुराच्या लोटांमुळे विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली. शिडीवरून खाली उतरण्याचा मार्ग न दिसल्याने मुला-मुलींनी वर्गाच्या खिडकीतून दोरी खाली फेकायला सुरुवात केली आणि सर्वांनी एकमेकांना मदत केली. श्वासोच्छवासाच्या तक्रारी असलेल्या चार विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोलकाता विमानतळावर आग:कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. डमडम विमानतळाच्या 3C निर्गमन टर्मिनल कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आगीमुळे विमानतळाचा मोठा भाग दाट आणि काळ्या धुराने व्यापला होता. सुरुवातीला बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सुरक्षा तपासणी विश्रामगृहाच्या एका भागात आग लागल्याचे सांगण्यात आले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा:
- Fire At Kolkata Airport : कोलकाता विमानतळावर आगीचे तांडव, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या पोहचल्या
- Thane Fire : शिळफाटा परिसरातील वेअरहाऊसला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही