भोपाल (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशची राजधानी भोपालमध्ये सरकारी कमला नेहरु मुलांच्या रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश -
शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, रुग्णालयाच्या मुलाच्या वार्डात लागलेल्या आगीची घटना ही अत्यंत दुःखद आहे. भोपाळच्या कमला नेहरू रूग्णालयात लागलेल्या आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी ही आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मोहम्मद सुलेमान यांच्या कडून केली जाणार आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे ट्वीट वैद्यकीय मंत्र्यांकडून मदतीची घोषणा -
मध्यप्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले की, कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वार्डात आग लागल्याने मृत्यू झालेल्या मुलांची संख्या ही चार झाली आहे. या वार्डात एकूण 40 मुले होती. त्यापैकी 36 मुले सुरक्षित आहेत. त्यांना योग्य जागावर हलवण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्या मुलांच्या आई-वडिलांना प्रत्येकी चार लाख रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांचे ट्वीट 8 ते 10 अग्नीशमन दलाच्या बंबांनी विझवली आग -
फतेहगड अग्नीशामक केंद्याच्या प्रभारी अधिकारी जुबेर खान यांनी अशी माहिती दिली की, सोमवारी रात्री जवळपास 9 वाजता रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. घटनास्थळी 8 ते 10 अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले होते. त्यांनी लवकर आग विझवली. त्यांनी सांगितले की, मुलांच्या रुग्णालयाच्या एका रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर भरला होता. आग कोणत्या कारणामुळे लागली होती याचा शोध अद्याप लागला नाही आहे. मात्र शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका आहे.
कमला नेहरु मुलांचे रुग्णालय हे भोपालमधील सरकारी हमीदिया रुग्णालयाचा एक भाग आहे. जे मध्यप्रदेशमधील सर्वात मोठ्या मुलांच्या रुग्णलयापैकी एक आहे.
हेही वाचा -दिवाळीची खरेदी करून परतताना भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार