नवी दिल्ली : दिल्लीतील चांदनी चौकातील भगीरथ पॅलेस ( Bhagirath Palace in Chandni Chowk, Delhi ) इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीच्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.(fire broke out in bhagirath palace electronic market)
Delhi Chandni Chowk Fire : चांदनी चौकातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल - दिल्लीतील भगीरथ पॅलेस
दिल्लीतील चांदनी चौकातील भगीरथ पॅलेस ( Bhagirath Palace in Chandni Chowk, Delhi ) इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (fire broke out in bhagirath palace electronic market)
![Delhi Chandni Chowk Fire : चांदनी चौकातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल (fire broke out](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17024862-thumbnail-3x2-f.jpg)
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू :घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. मार्केटमधील तीन ते चार इमारतींमध्ये आग पसरल्याचे वृत्त आहे. एका इमारतीत 25 ते 30 दुकाने आहेत. त्याचबरोबर आग इतकी भीषण आहे की ती लांबूनही दिसते. सध्या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत वेळोवेळी आगीच्या घटना घडत असतात, त्यामुळे अग्निसुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात.
घटनास्थळी गोंधळाचे वातावरण :सायंकाळी उशिरा येथील एका दुकानाला अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. आग पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. घटनास्थळाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. सायंकाळी दुकान बंद करण्याच्या वेळी ही आग लागली. घाऊक बाजार असल्याने वाहतुकीसाठीचा माल रस्त्यावर पडून होता, त्यामुळे बचाव कार्यावर परिणाम झाला.