महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Warehouse Fire Delhi : दिल्लीतील तीन मजली इमारतीला आगीत मृतांचा आकडा २७ वर, १२ जण जखमी - Warehouse Fire Delhi

तीन मजली इमारतीला भीषण आग ( huge fire in a three-story building ) लागली. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला ( 27 people died ). या इमारतीत परफ्यूम आणि तुपाचे गोडाऊन असल्याने आग भडकली आहे. याबाबतची माहिती अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांचे प्रयत्न रात्रभर सुरु होते.

fire
fire

By

Published : May 13, 2022, 10:39 PM IST

Updated : May 14, 2022, 8:17 AM IST

दिल्ली - दिल्लीमध्ये मुंडका परिसरातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग ( huge fire in a three-story building ) लागली आहे. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला ( 27 people died ). तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीत परफ्यूम आणि तुपाचे गोडाऊन असल्याने आग भडकलीे. याबाबतची माहिती अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले.

६० पेक्षा जास्त लोकांची सुटका - या इमारतीतून सुमारे किमान ६० पेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की आणखी काही व्यक्ती अडकल्या असतील तर ते नंतर शितीकरण केल्यावर समजून येईल. ही तीन मजली इमारत होती. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर २६ मृतदेह आढळून आले. आगीत हे लोक पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटवणे दुरापास्त झाले असल्याचे दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न -दिल्लीतील मुंडका स्थानकाजवळच्या तीन मजली इमारतीला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते. त्या ठिकाणी सुरुवाताली आगीचा भडका उडाला. त्यानंतर आग दुसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी २७ बंब प्रयत्नांची शर्थ करीत होते. आगीत सुरुवातीला २० जणांचा होरपळून किंवा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. उशिरा एकूण २७ मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आले.

इमारतीला एनओसीच नव्हती -आग लागलेल्या इमारतीसंदर्भातील माहिती आता समोर येत आहे. या इमारतीच्या वापराला एनओसीच दिली गेली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आग लागल्यानंतर या इमारतीचे मालक फरार झाले आहेत. त्यांचा आता शोध सुरू करण्यात आला आहे. ते सापडल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसानी दिली.

Last Updated : May 14, 2022, 8:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details