महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fire At Kolkata Airport : कोलकाता विमानतळावर आगीचे तांडव, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या पोहचल्या - कोलकाता विमानतळ

बुधवारी रात्री कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग एसी केबलमधून लागल्याचे निष्पन्न झाले आहे.

Fire At Kolkata Airport
कोलकाता विमानतळावर आग

By

Published : Jun 14, 2023, 10:45 PM IST

Updated : Jun 14, 2023, 11:06 PM IST

कोलकाता : कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. डमडम विमानतळाच्या 3C निर्गमन टर्मिनल कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आगीमुळे विमानतळाचा मोठा भाग दाट आणि काळ्या धुराने व्यापला होता. सुरुवातीला बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सुरक्षा तपासणी विश्रामगृहाच्या एका भागात आग लागल्याचे सांगण्यात आले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

एसी केबलमधून लागली आग : विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी आग लागल्याने विमानतळ परिसरातील वेटिंग लाऊंजमधील प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम बंगालचे अग्निशमन सेवा मंत्री सुजित बसू यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, 'ही आग एसी केबलमधून लागली. आमच्या अग्निशमन जवानांनी परिश्रमपूर्वक काम केले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात : रात्री 9 च्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळाच्या सुरक्षा विश्रामगृहाच्या बाजूने दाट धूर निघत असल्याचे दिसले. क्षणार्धात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर लाऊंजच्या बाजूने भीषण आगीच्या ज्वाळा दिसल्या. घटनेनंतर लगेचच विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर हालचाल केली. मात्र हळूहळू आग वाढत असल्याने अखेर अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त : विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागताच संपूर्ण रिंगणातील सेंट्रल एसी बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळाचे गेट बंद करण्यात आले आहेत. बिधाननगरचे पोलिस आयुक्तही घटनास्थळी दाखल झाले. सध्या विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व सुरक्षा तपासणी यंत्रणा तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. MP Satpura Bhawan Fire: सातपुडा इमारतीला लागली आग; १५ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
  2. Market Yard Fire News: पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पुन्हा अग्नी तांडव; दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी
  3. Chemical Company Fire : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग; आगीत एकाचा मृत्यू, 5 गंभीर
Last Updated : Jun 14, 2023, 11:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details