महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fire News : चीनमध्ये रसायन कारखान्याला भीषण आग, 36 जणांचा मृत्यू - china news

चीनच्या हेनान प्रांतातील एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक सरकारने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर दोन जण बेपत्ता आहेत. ( Fire at industrial wholesaler in central China )

Fire kills 36 At industrial
आगीत ३६ जणांचा मृत्यू

By

Published : Nov 22, 2022, 12:14 PM IST

चीन :चीनच्या हेनान प्रांतातील एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक सरकारने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर दोन जण बेपत्ता आहेत. ज्या कंपनीत आग लागली त्या कंपनीत रसायने आणि इतर औद्योगिक वस्तू बनवल्या जातात. ( Fire at industrial wholesaler in central China )

आगीचे कारण अस्पष्ट :वेनफांग जिल्हा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली आणि सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली.आगीचे कारण आणि या दुर्घटनेत कंपनीतील किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही

यापूर्वी भीषण आगीत 173 लोकांचा मृत्यू : वाढती स्पर्धा आणि भ्रष्टाचारामुळे चीनमध्ये सुरक्षा उपायांमध्ये हलगर्जीपणा सामान्य झाला आहे. 2015 मध्ये उत्तरेकडील बंदर शहर टियांजिनमधील रासायनिक गोदामात झालेल्या भीषण आगीत 173 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनच्या चांगशा शहरात एक मोठी दुर्घटना घडली. येथील 42 मजली इमारतीला भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की इमारतीचे सर्व मजले त्यात जळून खाक झाले. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीमध्ये चायना टेलिकॉम या चिनी टेलिकम्युनिकेशन कंपनीचे कार्यालय आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 36 गाड्यांचा वापर करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details