महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जामनगरच्या हॉटेलची आग आटोक्यात, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश - जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी

गुजरातच्या जामनगरच्या हॉटेलची आग आटोक्यात आली आहे. त्यामध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांनी ही माहिती दिली.

जामनगरच्या हॉटेलची आग आटोक्यात
जामनगरच्या हॉटेलची आग आटोक्यात

By

Published : Aug 12, 2022, 12:36 PM IST

जामनगर (गुजरात)जामनगर भागातील अलेंटो हॉटेलला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांनी सांगितले की, सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. श्वासोच्छवासाची तक्रार असलेल्या दोन तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवळपास २७ लोक हॉटेलच्या इमारतीत अडकले होते.

मोती खावडीजवळील हॉटेलला लागलेली आग आटोक्यात आली आहे. हॉटेलमध्ये 27 लोक आणि हॉटेलचे कर्मचारी होते. सर्व सुखरूप आहेत. 2-3 जणांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, - पारघी

माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व 27 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. कोणीही जखमी झालेले नाही. आग नियंत्रणात आणली गेली आहे आणि परिस्थिती देखील नियंत्रणात आहे, - प्रेमसुख देलू, जामनगर, एसपी

गुजरातमधील जामनगर येथील अलेंटो हॉटेलला गुरुवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हे हॉटेल जामनगर शहराच्या केंद्रापासून द्वारकाच्या दिशेने 25 किमी अंतरावर आहे. आता आग आटोक्यात आली आहे.

हेही वाचा - काँग्रेस आमदाराच्या जावयाच्या गाडीने 6 जणांना चिरडले, सर्व 6 जणांचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details