महाराष्ट्र

maharashtra

FIR against Kalicharan Maharaj : महात्मा गांधींबाबत विवादित वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

By

Published : Dec 27, 2021, 3:44 PM IST

Updated : Dec 27, 2021, 4:32 PM IST

रायपूरच्या रावणभाठा मैदानात आयोजित धर्म संसद ( Raipur Dharma Sansad Controversy ) मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत विवादित वक्तव्य करणारे धर्मगुरु कालीचरण महाराज यांच्या विरोधात रायपूरच्या टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ( FIR against Kalicharan Maharaj ) आहे. अनेक राजनेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

कालीचरण महाराज
कालीचरण महाराज

रायपूर (छत्तीसगड) -रायपूरच्या रावणभाठा मैदान येथे आयोजीत दोन दिवसीय धर्म संसदच्या शेवटच्या दिवशी ( Raipur Dharm Sansad Controversy ) धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी नथूराम गोडसे यांना नमने केले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत विवादित वक्तव्य केले ( Controversial Statement on Mahatma Gandhi )आहे. कालीचरण महाराजांच्या विवादित भाष्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्याविरोधात रायपूरच्या टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ( FIR against Kalicharan Maharaj ) आहे.

काय म्हणाले होते कालीचरण..?

" नथूराम गोडसेजींना नमस्कार आहे... देशाच्या विभाजनासाठी महात्मा गांधी जबाबदार आहेत...पोलीस नसते तर आतापर्यंत आपले सत्यानाश झाले असते...जोपर्यंत राजा कट्टर हिंदुवादी नसेल, तोपर्यंत पोलीस हिंदूंना सपोर्ट नाही करु शकत..."

काय म्हणाले कालीचरण महाराज

या वक्तव्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी दिली प्रतिक्रिया

बापू आम्हाला लाज वाटते, तुझे हत्यारे अजून जिवंत आहेत

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) ने ट्वीट करत कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'सत्य व अहिंसाला खोटे व हिंसक कधी हरवू शकत नाही. बापू आम्हाला लाज वाटते, तुझे हत्यारे अजून जिवंत आहेत.

बोलताना नवाब मलिक
नवाब मलिक यांचे ट्विट

राहुल गांधी यांनी बापूंचे विचार ट्वीट करत व्यक्त केली प्रतिक्रिया

काँग्रेस नेता राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी महात्मा गांधींच्या विचारांबाबत ट्वीट केले. ते म्हणाले, 'तुम्ही मला साखळ्यांनी बांधू शकता, त्रास देऊ शकता, शरीर संपवू शकता, पण माझ्या विचारांना कैद करू शकत नाही.

राहुल गांधी यांचे ट्विट

अहिंसात्मक भाष्य खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ( CM Bhupesh Baghel ) यांनी धर्मगुरु कालीचरण यांच्या राष्ट्रपितांबाबतच्या वक्तव्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे ठिकाण शांतीप्रिय असून ही गुरु घासीदास यांची जमीन आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे अहिंसात्मक भाष्य खपवून घेतले जाणार नाही. राष्ट्रपिता गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्या मानसिकता कशी आहे ते दिसून येते. समाजात विष कालवणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

बोलताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री

महंत रामसुंदर दास यांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर घेतला आक्षेप

राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास (Mahant Ramsundar Das) म्हणाले, की पुढील वर्षी होणाऱ्या धर्म संसदेत सहभागी होणार नाही. व्यासपीठावरून महात्मा गांधी यांच्याबद्दल तिरस्कारजन्य विधाने करण्यात आली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यावेळी संतापलेले महंत रामसुंदर दास हे कार्यक्रमातून बाहेर पडले. व्यासपीठावरून महात्मा गांधी यांना शिवीगाळ केली आहे. त्याला मी विरोध करत आहे. हा सनातन धर्म नाही.

बोलताना महंत रामसुंदर दास

हे ही वाचा - Kalicharan Controversial Statement : धर्मसंसदेत कालीचरण यांच्याकडून राष्ट्रपित्यांबद्दल अपशब्द, महंत रामसुंदर दास म्हणाले...

Last Updated : Dec 27, 2021, 4:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details