महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

FIR against Tajinder Bagga and Kumar Vishvas: तजिंदर बग्गा आणि कुमार विश्वास यांच्यावरील एफआयआर रद्द - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. (AAP Government in Punjab). पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भाजप नेते तजिंदर पाल बग्गा (Tajinder Pal Bagga) आणि प्रख्यात कवी कुमार विश्वास (Kumar Vishvas) यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. (FIR against Tajinder Bagga and Kumar Vishvas).

तजिंदर बग्गा आणि कुमार विश्वास
तजिंदर बग्गा आणि कुमार विश्वास

By

Published : Oct 12, 2022, 12:33 PM IST

चंदीगड: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भाजप नेते तजिंदर पाल बग्गा (Tajinder Pal Bagga) आणि प्रख्यात कवी कुमार विश्वास (Kumar Vishvas) यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. (FIR against Tajinder Bagga and Kumar Vishvas). उच्च न्यायालयाचा हा निर्णय पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारला मोठा झटका मानला जातो आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कुमार विश्वास यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

कुमार विश्वास यांनी ट्विट करून लिहिले की, "सरकार स्थापन होताच पंजाब पोलिसांनी माझ्यावर एफआयआर नोंदवली. ती निराधार एफआयआर आज पंजाब हायकोर्टाने फेटाळून लावली. न्यायपालिकेचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार. प्रिय अनुज भगवंत मान यांना आवाहन आहे की पंजाबचा स्वाभिमान शुल्लक नजरांपासून वाचवा."

काय आहे प्रकरण? : पंजाबच्या रोपड येथे कुमार विश्वास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुमार विश्वास यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर त्यांचे खलिस्तानशी संबंध असल्याचा खोटा आरोप लगावला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी रूपनगर पोलिसांच्या कारवाईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

कुमार विश्वास यांच्याविरुद्ध कलम १५३, १५३ए, ५०५, ५०५ (२), ११६ आणि कलम १४३, १४७, ३२३ (हल्ला), ३४१, १२०-बी (गुन्हेगारी कट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार विश्वास यांच्याशिवाय काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. लांबा यांच्यावर विश्वास यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्याचा आरोप आहे.

काय म्हणाले कुमार विश्वास? : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत वक्तव्य केले होते. कुमार विश्वास यांनी दावा केला होता की केजरीवाल यांनी त्यांना एका संभाषणात सांगितले होते की एक दिवस ते पंजाबचे मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तान) पहिले पंतप्रधान होतील. त्यांच्या वक्तव्यानंतर पंजाब पोलिसांनी कुमार विश्वास यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

केजरीवाल यांच्याबद्दल ट्विट केल्याबद्दल कुमार विश्वास यांच्याप्रमाणेच भाजप नेते तजिंदर बग्गा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पंजाब पोलिसांनी बग्गाला दिल्लीत अटक केली. याचा निषेध म्हणून बग्गा यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर तजिंदर बग्गा यांनी ट्विट करत पंजाब हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या तोंडावर थप्पड मारल्याचे लिहिले. माझ्यावरील एफआयआर खोटा ठरवून रद्द करण्यात आला असे बग्गा आपल्या ट्वीट मध्ये म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details