हैद्राबाद :तेलंगणा पोलिसांनी ( Telangana Police ) टीआरएस आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सायबराबादचे सीपी स्टीफन रवींद्र यांनी सांगितले की, आम्हाला टीआरएस आमदारांकडून माहिती मिळाली होती की त्यांना पैसे, करार आणि पदांची आमिष दाखवली जात आहे.तेव्हा फार्महाऊसवर छापा टाकला आणि तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुनुगोडे पोटनिवडणुकीत तेलंगणाच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडली. दिल्लीतील तीन लोकांनी टीआरएसच्या चार आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.त्यांना शहराच्या बाहेरील अजीजनगर येथील फार्महाऊसवर बोलावण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला रंगेहात पकडले, त्यानंतर तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
हैदराबादमध्ये नोटांच्या बंडलांसह दिल्लीहून आलेल्या तिघांना अटक केल्यानंतर तेलंगणात खळबळ उडाली आहे. मुनुगोडे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांची घोडेबाजी करण्याच्या उद्देशाने काही लोक शहराबाहेरील फार्म हाऊसवर टीआरएसला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या फार्महाऊसवर छापा टाकला आणि त्यांना रंगेहात पकडले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. मोईनाबादजवळील एका फार्महाऊसवर अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी त्याची गुप्त भागात चौकशी करत आहेत. या डीलमागे कोण आहे, यावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींकडून जप्त केलेला मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
तेलंगणातील मोईनाबाद येथे बुधवारी रात्री उशिरा टीआरएसच्या चार आमदारांना लाच देताना भाजपच्या नेत्यांना रंगेहात पकडण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे. मोईनाबाद पोलिसांनी टीआरएस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करताना भाजप नेत्यांना कथितपणे पकडले. छाप्यादरम्यान टीआरएसचे चार आमदार पायलट रोहित रेड्डी, बिरम हर्षवर्धन रेड्डी, रेगा कंथाराव, गुव्वाला बलराज फार्म हाऊसवर उपस्थित होते. सायबराबाद पोलिसांनी सांगितले की, आम्हाला टीआरएस आमदारांकडून पैसे, पदाची आमिष दाखवली जात असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी ही माहिती आमच्याशी शेअर केली. त्या माहितीच्या आधारे आम्ही या फार्मवर छापा टाकला आहे. या माहितीवरून आम्ही छापा टाकला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.