महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Economic Survey : अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर, 2022-23 मध्ये GDP वाढ 8-8.5% 5 टक्के अपेक्षित - आर्थिक पाहणी अहवाल 2022

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ( Nirmala Sitharaman tables the Economic Survey ) आर्थिक पाहणी अहवाल ( Economic Survey 2022 ) हा संसदेमध्ये सादर केला. अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालातून मांडला जातो. तर आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे जाणून घ्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण
Economic Survey

By

Published : Jan 31, 2022, 1:09 PM IST

Updated : Jan 31, 2022, 7:25 PM IST

हैदराबाद - संसदेत 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. त्यापूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ( Nirmala Sitharaman tables the Economic Survey ) आर्थिक पाहणी अहवाल हा संसदेमध्ये सादर केला. अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालातून मांडला जातो. हा अहवाल अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारा आहे. जाणून घेऊया, त्यामधील महत्त्वाचे मुद्दे.

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवालात 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील देण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 (एप्रिल 2022 ते मार्च 2023) या आर्थिक वर्षात 8-8.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) अंदाजानुसार, आर्थिक विकास दर 9.2 टक्के असू शकतो.

आर्थिक पाहणी अहवालात अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची स्थिती आणि विकासाला गती देण्यासाठी करावयाच्या सुधारणांचा तपशील देण्यात आला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 7.3 टक्के घट झाली आहे. आर्थिक पाहणी अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत करण्यासाठीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

हेही वाचा -Union Budget 2022 : अर्थसंकल्पातील 'या' महत्त्वाच्या संज्ञा, जाणून घ्या सोप्या भाषेत...

Last Updated : Jan 31, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details