नवी दिल्ली - एका किशोरवयीन अनाथ मुलीला तिच्या दिवंगत वडिलांनी सोडलेल्या थकित कर्जाच्या परतफेडीसाठी कर्ज एजंटकडून त्रास दिल्याच्या वृत्त समोर आल्यानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हस्तक्षेप केला आहे. ( Finance Minister Sitharaman ) त्यांनी सबंधीत अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थमंत्र्यांनी वित्तीय सेवा विभाग आणि जीवन विमा महामंडळातील अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.
'अनाथ टॉपर फेसिस लोन रिकवरी नोटिस' या शीर्षकाच्या बातमीला जोडून सीतारामन यांनी ट्विट केले, 'कृपया हे प्रकरण तपासा. तसेच, सद्यस्थितीची थोडक्यात माहिती द्या. भोपाळ येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय वनिषा पाठकचे वडील एलआयसी एजंट होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयातून कर्ज घेतले होते.
वनिशा अल्पवयीन असल्याने, अहवालानुसार, एलआयसीने तिच्या वडिलांची सर्व बचत आणि मासिक कमिशन बंद केले आहे. अहवालात असे म्हटले आहे, की (2021)मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे, की त्यांना 2 फेब्रुवारी 2022 रोजी 29 लाख रुपये भरण्यासाठी अंतिम कायदेशीर नोटीस मिळाली होती. अन्यथा त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास सांगण्यात आले होते.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या वनिषा पाठकने CBSE 10वी परीक्षेत 99.8% मिळवले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात त्याने कोरोनामुळे तीचे आई-वडीलांचा मृत्यू झालेला आहे. वनिशाने सांगितले होते की, जेव्हा तिचे आई-वडील रुग्णालयात दाखल होते, त्यावेळीही ती परीक्षेची तयारी करत होती. वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मुलीने कठोर परिश्रम केले आणि अव्वल मानांकन मिळवले. सध्या वनिषा तिच्या लहान भावासोबत मामाच्या घरी राहत आहे.
हेही वाचा -जॉनी डेप विरुद्ध खटला हरल्यानंतर अंबरला सौदी व्यक्तीने घातली लग्नाची मागणी