मुंबई - केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल रुपया (Digital rupee) आरबीआयकडून जारी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अंर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget2022) आज मंगळवार (दि.) 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत (2022-23)चा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. (RBI to issue digital rupee from 2022-23) दरम्यान, याद्वारे देशात अधिकृतपणे डिजीटल चलन सुरू केले जाईल. तसेच, डिजीटल रुपयामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केले जाणार
ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल रुपया (Digital rupee) आरबीआयकडून जारी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अंर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केली आहे. (Union Budget 2022 Live Updates) यंदाच्या आर्थिक वर्षापासून आरबीआयकडून भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजीटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केले जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भत्त्याच्या संदर्भात कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही