गोवा (पणजी)- आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकानी मुख्यमंत्री निवासाबाहेर आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाला राजकीय स्वरूप दिल्याने पोलिसांनी मध्यरात्री आंदोलनातील नेत्यांना ताब्यात घेतले. (Anganwadi Workers Protest front of Goa CM House) यावेळी झालेल्या धक्काबुकीत काही महिला जखमी झाला आहेत.
अचानक आलेल्या मोर्चामुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते यात बरीच झटापट झाली
आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी मागच्या सात दिवसांपासून पणजीतील आझाद मैदानावर (Anganwadi Workers In Panaji) आंदोलन सुरू केले होते. मात्र, या आंदोलनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी बुधवारी दुपारी आपला मोर्चा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी नेला होता. अचानक आलेल्या मोर्चामुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते (Anganwadi workers protest at Azad Maidan in Panaji) यात बरीच झटापट झाली. यात काही महिला जखमी झाल्या. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आंदोलन कर्त्यांना मध्यरात्री अटक
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले होते. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांचे निमंत्रण धुडकावून लावत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासाबाहेरच आपले आंदोलन चालू ठेवले. यात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पुन्हा एकदा आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात मध्यरात्रीच्या सुमारास झटापट झाली.
तरीपण मुख्यमंत्र्यांची मागणी धुडकावून लावली
मुख्यमंत्री डॉ. सावंत स्वतः आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांशी संवाद साधायला पुढे सरसावले होते. (Leader of Opposition in Goa Digambar Kamat) मात्र, त्यांची विनंती आंदोलकांनी धुडकावून टाकली. 'आमच्या नेत्यांची आधी कारागृहातून सुटका करा, मगच चर्चेला या, 'अशी मागणी आंदोलनकर्त्या सेविकांनी लावून धरली. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनीही आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, आंदोलनातील नेते हृदयनाथ शिरोडकर यांच्याविना आपण चर्चेस तयार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्थी आणि आंदोलनावर तोडगा