महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अभिनेता सनी देओल यांना कोरोनाची लागण; गेल्या महिनाभरापासून होते मनालीत - बॉलीवुड अभिनेता सनी देओल

अभिनेता आणि खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून ते मनाली इथे होते. ते मंगळवारी मुंबईला परतणार होते. मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी मुंबईला जाणे टाळले.

sunny
अभिनेता सनी देओल यांना कोरोनाची लागण

By

Published : Dec 2, 2020, 8:12 AM IST

Updated : Dec 2, 2020, 8:45 AM IST

मनाली: अभिनेता आणि पंजाबच्या गुरदासपूरचे बीजेपी खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते विश्रांतीसाठी हिमाचल प्रदेशच्या मनालीत होते. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागाचे सचिव अमिताभ अवस्थी यांनी देओल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

एक महिन्यापासून मनालीत वास्तव्य

सीन देओल यांच्या खांद्यावर गेल्याच महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे आले होते. मनाली जवळ असलेल्या दशाल या गावात त्यांचा मुक्काम होता. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटूंबातील सदस्यही होते. त्यांचे कुटूंबीय मुंबईला परत गेले आहेत. सनी यांनाही मंगळवारी मुंबईत जायचे होते. मात्र त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटीन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

मुंबईला जाण्याच्या तयारीत होते

सनी मनाली वास्तव्यात दर दहा दिवसांनी कोरोनाची चाचणी करत होते. अशी माहिती डॉ. सुशील चंद्र यांनी दिली आहे. मंगळवारी त्यांना मुंबईला जायचे असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले.

आत्ता पर्यंत 'या' अभिनेत्यांना झालीय कोरोनाची लागण

सनी देओल यांच्या आधी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मलायका अरोरो, पार्थ समथान, सतिश शाह, हिमांशू कोहली, अफताब शिवदासीनी, कनिका कपूर, यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा-अभिनेता-निर्माता निखिल द्विवेदींनी मालदीवमध्ये सुट्टी घालवणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींना फटकारले

हेही वाचा-अभिनेता अनिल कपूर अ‍ॅकिलिस टेंडन आजाराने त्रस्त, सोशल मीडियावर दिली माहिती

Last Updated : Dec 2, 2020, 8:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details