महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Car Parking: कार पार्क केल्याचे कारण देत महिलेला मारहाण; व्हिडिओ व्हायरल - कोतवाली परिसरात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ

गाझियाबादच्या कोतवाली भागात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिलेलाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. (Car Parking) एवढेच नाही तर महिलेला फरफट नेले आहे. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. गाडी पार्क करण्यावरून ही घटना घडली आहे.

कार पार्क केल्याचे कारण देत महिलेला मारहाण
कार पार्क केल्याचे कारण देत महिलेला मारहाण

By

Published : Sep 11, 2022, 9:43 PM IST

नई दिल्ली (गाजियाबाद) - येथे आता गाडी पार्क करण्यावरून वाद झाला आहे. यावरून जोरदार एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करण्यावरून ही मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नाही तर महिलेला अगदी फरफटत नेले आहे. यामध्ये अनेक जण जखमीही झाले आहेत. दरम्यान, पोलीस यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप महिलेच्या बाजूने करण्यात आला आहे.

कार पार्क केल्याचे कारण देत महिलेला मारहाण

येथे महिलेचे कुटुंब हॉटेल चालवते. असेच एकदा दोन दिवसांपूर्वी याच लोकांशी भांडण झाल्याचा आरोप आहे. हॉटेल चालवणाऱ्या महिलेच्या कुटुंबीयांनी कार पार्क केलेल्या लोकांना सांगितले की, त्यांच्या घरी पाहुणे आहेत, थोडा वेळ गाडी काढा. कार हटवण्याऐवजी हल्लेखोरांनी मारहाण सुरू केली. एवढेच नाही तर इतर अनेकांना बोलावून प्रचंड गोंधळ सुरू केला असाही आरोप त्या महिलेने केला आहे.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गुंडांकडून दररोज चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली जाते, असे पीडितेचे म्हणणे आहे. आम्ही त्यांना गाडी काढायला सांगितल्यावर ते चिडले. त्यांनी लोकांना बोलावून आणले आणि आम्हाला मारहाण केली. तसेच, घर विकून निघून जा अन्यथा जीव गमवावा लागेल, असा इशाराही दिला आहे असही त्या महिलेने सांगितले आहे. त्यांच्या या भीतीमुळे आमचे कुटुंब येथे राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details