महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात दोन गटांत हाणामारी; काही ठिकणी जाळपोळ - केरूर येथे बुधवारी दोन गटांमध्ये हाणामारी

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील केरूर येथे बुधवारी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

दोन गटात हाणामारी झाली तसेच काही ठिकाणी जाळपोळ
दोन गटात हाणामारी झाली तसेच काही ठिकाणी जाळपोळ

By

Published : Jul 7, 2022, 3:20 PM IST

Updated : Jul 7, 2022, 5:18 PM IST

बागलकोट (कर्नाटक) -कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील केरूर येथे बुधवारी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वृत्तानुसार, हल्लेखोरांनी काही वाहनेही जाळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शुक्रवारपर्यंत परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. हिंदू जागरण वेदिकेचे जिल्हा सचिव अरुण कट्टीमणी आणि त्यांच्या दोन मित्रांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे.

लोखंडी रॉडने वार करण्यात आले - कट्टीमणी आणि त्याचे मित्र केरूर शहरातील बस स्टॉपवर जात असताना ही घटना घडली. अचानक मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी अरुण यांच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच, त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आले. त्याच्या दोन मित्रांवरही चाकूने वार केले आहेत.

हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही - जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. संतप्त जमावाने भाजी मार्केटमधील एका दुकानाची जाळपोळ केली, दहा दुचाकी आणि अनेक वाहनांचे नुकसान केले. पोलिसांनी केरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा -चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात ट्विटरकडे तक्रार करणार -नरोत्तम मिश्रा

Last Updated : Jul 7, 2022, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details