रायपुर (छत्तीसगड) -रायपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सुमारे अर्धा डझन विद्यार्थ्यांनी मिळून ही घटना घडवली आहे. ( Student Killed In Raipur ) किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. वादात काही विद्यार्थ्यांनी मिळून विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यामुळे विद्यार्थी जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णवाहिकेने मेकहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
उत्तर न दिल्याने त्याने अचानक मारहाण करण्यास सुरुवात - मोहन सिंग राजपूत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो खमत्राई येथील वीर शिवाजी नगर सार्वजनिक उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत होता. मोहन हा त्याच्या सहकाऱ्यांसह काशीराम उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीची पुरवणी परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षेतून बाहेर पडत असताना परीक्षा केंद्रात इयत्ता 11वी'च्या विद्यार्थ्यांशी त्याचा वाद झाला. त्या वादात त्याचा मृत्यू झाला. "परीक्षेतून बाहेर पडताना काही मुले मोहनला इंग्रजीत प्रश्नांची उत्तरे देत होती. उत्तर न दिल्याने त्याने अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोहनला अनेक मुलांनी मिळून मारहाण केली.