तिरुअनंतपुरम : अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयाचा संपूर्ण जगात जल्लोष करण्यात आला. भारतातील लोकांनीही या सामन्याचा भरपूर आनंद लुटला. मात्र केरळमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोषा दरम्यान हिंसक घटना समोर आल्या आहेत. (violence after World Cup final in Kerala). अर्जेंटिनाच्या विजयानंतर लगेचच, 17 वर्षीय अक्षय कोल्लम लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर विजयाच्या उत्सवा दरम्यान अस्वस्थ वाटत होते. जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (FIFA world cup 2022 violence).
FIFA World Cup 2022 : वर्ल्डकप फायनलनंतर मोठा हिंसाचार; पोलिसाला मारहाण, एकाचा मृत्यू - अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोषा दरम्यान हिंसक घटना
केरळमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोषा दरम्यान हिंसक घटना समोर आल्या आहेत. (violence after World Cup final in Kerala). कन्नूरमध्ये चाकूने भोसकल्याने तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. दुसऱ्या एका घटनेत, कोचीमध्ये फुटबॉल चाहत्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. (FIFA world cup 2022 violence).
अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकला : फिफा विश्वचषक 2022 (FIFA WC 2022 Final) च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाकडून शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या विश्वचषक कारकिर्दीचा शानदार अंत केला. पूर्ण वेळेत स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि नंतर अतिरिक्त वेळेत स्कोअर 3-3 असा बरोबरीत राहिला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.
केरळच्या सर्व भागांमधून हिंसाचाराच्या बातम्या : राज्याच्या इतर भागांमध्ये, विशेषत: कन्नूरमध्ये, अर्जेंटिनाच्या विजयाच्या उत्सवाला हिंसक वळण लागले आहे. चाकूने भोसकल्याने तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या एका घटनेत, कोचीमध्ये फुटबॉल चाहत्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. फुटबॉल खेळावर प्रेम करणाऱ्या केरळमधील इतर काही शहरांमधूनही हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत.