झुंझुनू ( राजस्थान ) - जिल्ह्यातील गुडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 19 एप्रिल) जीप उलटून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू ( Nine Dead as Pickup Overturned in Rajasthan ) झाला आहे. सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर झुंझुनूच्या बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nine Dead as Pickup Overturned - जीप उलटून नऊ जणांचा मृत्यू, दहा जखमी - जीप उलटून नऊ जणांचा मृत्यू
झुंझुनू जिल्ह्यातील गुडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 19 एप्रिल) चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. या अपघातात ( Nine Dead as Pickup Overturned ) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमींवर बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनूच्या बडाउ की ढाणी येथील एकाच परिवारातील सुमारे 25 जण एका जीपमधून उदयपुरवाटीच्या लोहागर येथे ( Udaipurwati Latest News ) मनसा माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर घरी परतताना लीला वाली ढाणी या गावाजवळील गुढा रस्त्यावर चालकाचा जीपवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे जीप उलटली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर झुंझूनू येथील बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हाधिकारी ( Rajasthan Marathi News ) जगदीश प्रसाद गौड व पोलीस उपाधीक्षक शंकरलाल छाबा, झुंझुनू सीएमएचओ डॉ. छोटे लाल गुर्जर यांनी बीडीके रुग्णालयात धाव घेतली.
हेही वाचा -Wife knife Attack On Husband : लपाछपीचा डाव, पत्नीचा पतीवर चाकूचा घाव