श्रीनगर : यंदा मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक काश्मीरमध्ये येत आहेत. असे असताना महिला कलाकारांनाही आपल्या अनोख्या आणि सुंदर कलेने काश्मीर जगासमोर ठेवायचे आहे. विविध राज्यांतील सुमारे ६० कलाकार पाच दिवसांच्या दौऱ्यावर काश्मीर खोऱ्यात आल्या आहेत. त्यांनी खोऱ्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन आकर्षक निसर्गचित्रे रंगवली आहेत.
महिला कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून काश्मीरचे साकारले सौंदर्य - महिला कलाकार
ईटीव्ही भारतशी बोलताना, महिला कलाकारांनी सांगितले की, “त्यांनी त्यांच्या पेंटिंग्सद्वारे तेथील सौंदर्य दाखवण्याची संधी मिळावी म्हणून काश्मीरची निवड केली. त्या पुरुष कलाकारांपेक्षा काही कमी नाहीत, असे त्यांनी सांगितले.
![महिला कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून काश्मीरचे साकारले सौंदर्य महिला कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून काश्मीरला केले प्रसिद्ध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15652976-638-15652976-1656142048209.jpg)
त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी महिला कलाकारांनी श्रीनगरमधील झेलम नदीवरील ऐतिहासिक झिरो ब्रिजवर रंगकाम केले. त्यांनी आपल्या कलेने झिरो ब्रिज, झेलम नदीत तरंगणाऱ्या बोटी आणि हाऊसबोटच्या आसपास चित्रे रेखाटली.
ईटीव्ही भारतशी बोलताना या महिला कलाकारांनी सांगितले की, “त्यांनी काश्मीर निवडले कारण त्यांना या ठिकाणचे सौंदर्य रेखाटण्याची संधी मिळाली. त्या पुरुष कलाकारांपेक्षा कमी नाहीत, असे त्या म्हणाल्या. त्यांनी काश्मीरच्या महिला कलाकारांनाही आपल्यासोबत सहभागी होऊन रंगविण्यासाठी आमंत्रित केल्याचे महिला कलाकारांचे म्हणणे आहे.