बंगळुरू- भावडांमध्ये विशेषत: जुळ्या भावडांमध्ये प्रेम अधिक असते, असे म्हटले जाते. पण, कर्नाटमध्ये जुळ्या बहिणींचे जगावेगळे व मन सुन्न करणारे प्रेम दिसून आले. लग्नानंतर विलग होण्याच्या भीतीने दीपिका व दिव्या या १९ वर्षीय जुळ्या बहिणींनी आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यात घडली आहे.
दिव्या व दीपिका या श्रीरंगपटन तालुक्यातील हनसनहळ्ळी या गावातील रहिवाशी होत्या. त्यांनी शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली आहे. त्या सुरेश आणि यशोधन यांच्या जुळ्या मुली होत्या. दोन्ही जुळ्या मुलींचे दोन विविध ठिकाणी लग्न जुळले होते. मात्र, त्या दोघींना लग्नामुळे वेगळे राहावे लागणार असल्याची कल्पनाच पसंत पडली नाही. त्यांनी दु:खी मनाने टोकाचे पाऊल घेतले. दिव्या व दीपिका यांनी शनिवारी सायंकाळी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. जुळ्या बहिणींच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एरेकेरे पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?