फाजिल्का (पंजाब) : पुन्हा एकदा सीमेपलीकडून भारतात ड्रग्ज पाठवण्याचा नापाक प्रयत्न झाला आहे. मात्र यावेळी फाजिल्का पोलिसांनी तत्परता दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला. फाजिल्का पोलिसांनी 29 बॉक्समधून 31 किलो 200 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Fazilka police recovered 31 kg of heroine). याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी हेरॉईनसह दोन तस्करांना देखील अटक केली आहे. (31 kg of heroine from Pakistan border).
संशयित ड्रोन तस्करी :काल भारत-पाकिस्तान सीमेवर हालचाल दिसून आली होती. त्यानंतर सीमेवर बीएसएफकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाळानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. यानंतर पोलिसांनी ही वसुली केली आहे.
डीजीपीचे ट्विट :पंजाबचे डीजीपी गोरव यादव यांनी ट्विट केले की, सीमापार अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. फाजिल्का पोलीस आणि बीएसएफ यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पर्दाफाश केला आहे. यावेळी 2 आरोपी तस्करांना अटक करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, ड्रग किंगपिनला अटक केल्यानंतर 31.02 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील आणि मागचे नेटवर्क तोडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या विचारसरणीनुसार पंजाब अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे.
गेल्या वर्षी देखील ड्रग्जवर कारवाई : सीमापार शत्रूंना रोखण्यासाठी पोलीस आणि बीएसएफ सातत्याने प्रयत्न करत आहेत. गोल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अमृतसर जिल्ह्यातील अटारीजवळील कक्कर गावात ड्रग्जची मोठी खेप जप्त केली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफने हेरॉईनचे वजन केले असता त्याचे एकूण वजन सुमारे 1 किलो असल्याचे आढळून आले. निर्यात केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 7 कोटी रुपये आहे. ही ड्रग्जची ही खेप पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनद्वारे टाकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.