मुरादाबाद -मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( Fatwa Aganist Muslim Doctor In Muradabad ) पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लीम डॉक्टरवर फतवा काढल्याची घटना समोर आली आहे. हा फतवा जारी करणाऱ्या हाफिज इम्रान वारसीविरुद्ध ( FIR Against Hafij Imran ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत हाफिज इम्रानला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण -मुरादाबादच्या महमूदपूर गावात 2 एप्रिल रोजी भाजपशी संबंधित डॉ. निजाम भारती यांनी आरएसएसच्या पथ संचलनावर पुष्पवृष्टी केली होती. त्यानंतर डॉ. निजाम भारती यांची हत्या करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असा फतवा जाहीर करण्यात आला. इतकेच नाही तर, फतव्यात रमजानच्या महिन्यात त्यांना मशिदीत जाऊ देऊ नये, त्यांना मारून टाकावे आणि मशिदीतून पळून गेलेल्यांना एक लाख रुपये द्यावेत, असेही फतव्यात नमूद करण्यात आले आहे. ही फतवा पत्रिका गावातील मशिदी आणि दुकानांमध्ये वाटली गेली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपी हाफिज इम्रानला अटक केली आहे.