तिरूवनंतपुरम -केरळमधील एका विशेष जलद न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत 106 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ( Raping Minor Girl In Kerala ) आरोपी वडील (2015)पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करत होते. दरम्यान, पीडित मुलगी 2017 मध्ये गर्भवती देखील झाली होती. वडिलांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार ( POCSO ) दोषी ठरवण्यात आले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदयकुमार यांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणे, तिला गर्भधारणा करणे, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणे आणि आई-वडील किंवा नातेवाईकाने बलात्कार करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सांगितले की, शिक्षा एकाचवेळी चालेल आणि दोषींना 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. ( Father Raping To Minor Girl ) न्यायालयाने आरोपीला एकूण 17 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.