रायपूर - रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात सहा महिन्याच्या ताक्षीचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. ताक्षी 'बिलारी अत्रेसिया' या आजाराने त्रस्त होती. ताक्षीची प्रकृती स्वस्थ असून प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे. काही दिवसानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.
सहा महिन्याच्या चिमुकलीवरील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात जवळपास 7 ते 8 तास चाललेली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. एका सहा महिन्याच्या चिमुकलीवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
प्रत्यारोपणासाठी रुग्णालय प्रशासनाने एक स्पेशल टीम तयार केली होती. डॉक्टर मोहम्मद अब्दुल नईम आणि डॉक्टर अजीत मिश्रा यांच्या टीमने हे ऑपरेशन केले. जवळपास 7 ते 8 तास ऑपरेशनसाठी लागल्याची माहिती आहे. ताक्षीला तिच्या वडिलांनीच जीवदान दिले आहे.
मध्य भारतात पहिल्यांदाच एका सहा महिन्यांच्या चिमुकलीवर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आल्याची घटना घडली आहे. १ वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांचे लिव्हर प्रत्यारोपण करणे अतिशय कठीण असते. आपल्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, फुप्फुसे याबरोबरच यकृत हादेखील एक महत्त्वाचा अवयव असतो. यकृत चयापचयाच्या क्रियेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करते. यकृत पूर्णत: निकामी होते, तेव्हा यकृत प्रत्यारोपण हीच एक संजीवनी असते.