महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Father Raped On Daughter : बाप लेकीच्या नात्याला काळीमा; नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने हादरले रामनगर - चिमुकलीवर बलात्कार केल्याने खळबळ

आई बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत नराधमाने आपल्या 11 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली. उत्तराखंडमधील रामनगर येथे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाच्या मुसक्या आवळत त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Father Raped On Daughter
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 13, 2023, 8:36 PM IST

रामनगर :आई घरी नसल्याची संधी साधत नराधम बापाने आपल्या 11 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमधील रामनगर येथे उघडकीस आल्याने रामनगर चांगलेच हादरले आहे. आईला महत्वाचे काम असल्याने तिने आपल्या बालिकेला बापाकडे सोपवले होते. मात्र दोन दिवसानंतर आई घरी परतल्यानंतर बालिकेने आपली आपबिती आईजवळ कथन केली. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी नराधमाच्या पत्नीने तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी बलात्कारी बापाला अटक केली आहे.

नराधन बापाने फासला नात्याला काळीमा :रामनगर ग्रामीण परिसरातील एका गावातील महिला आपल्या 11 वर्षाच्या मुलीला बापाकडे सोपवून महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेली होती. यावेळी नराधम बापाने बालिकेला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पीडित चिमुकली प्रचंड हादरली होती. तिची आई घरी नसल्याने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्यामुळे नराधमाने या बाबीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या :पीडितेची आई दोन दिवसानंतर बाहेरगावावरुन गरी आल्यानंतर बालिकेने तिच्यावर बेतलेली आपबिती कथन केली. त्यामुळे तिच्या आईला धक्काच बसला. पीडितेच्या आईने बालिका सुखरुप राहील म्हणून तिच्या वडिलांकडे तिला सोपवले होते. मात्र तिचा बापच हैवाण निघाल्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे हादरलेल्या मातेने बालिकेला घेून रामनगर पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी बालिकेच्या तक्रारीवरुन नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नराधमाने चिमुकलीला केली मारहाण :आई बाहेरगावी गेल्यानंतर नराधम बापाने बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यामुळे बालिकेने तिच्या बापाला विरोध केल्याने नराधमाने पीडितेला जबर मारहाण केली. त्यामुळे बालिका चांगलीच हादरली होती. तिच्या भीतीचा फायदा घेत नराधमाने बालिकेवर अत्याचार केला. मात्र आई बाहेरगावावरुन घरी आल्यानंतर बालिकेने ही बाब आपल्या आईकडे कथन केली.

न्यायालयाने नराधमाला ठोठावली कोठडी :बापानेच आपल्या 11 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने रामनगर परिसरात मोठी खळबळ उडाली. पीडितेच्या आईने नराधम पतीविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी नराधमावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अटक करुन नराधमाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. पुढील तपास रामनगर पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - Firing In Sitamarhi SSB Camp : आपसातील वादातून जवानावर सहकाऱ्याचा गोळीबार, भारत नेपाळ सीमेवर होते तैनात

ABOUT THE AUTHOR

...view details