बंगळुरू -शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 12 हजार रुपयांसाठी वडिलांनी मुलावर पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला ( Father Poured Petrol on His Son ) आहे. चारमाजपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगरमध्ये ही घटना घडली. यातील मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सुरेंद्र असे या वडिलांचे तर अर्पित असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील आठवड्यात अर्पितचे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचाच राग मनात धरून वडिलांनी घरातच मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्यानंतर अर्पित घराबाहेर पडला. तो त्यांना विनवणी करत होता, मात्र, वडिलांनी काडी लावून अंगावर फेकली. आग लागल्यानंतर अर्पित परिसरात धावत होता.