मेरठ :रायपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंह यांच्यावर अर्चना गौतम यांनी धमक्यासह गैरवर्तन आणि असभ्यतेसारखे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अर्चनाच्या वडिलांनी २० फेब्रुवारीला तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी आता प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांच्याविरोधात मंगळवारी परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप सिंहविरोधात तक्रार दाखल : 28 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते, बिग बॉस स्पर्धक आणि मॉडेल अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी संदीप सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आता तहरीरच्या आधारे संदीप सिंहवर कलम ५०६, ५०९, ५०६ आणि एससी एसटी कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्यावर जातीवाचक शब्द वापरून त्यांचा अपमान केला, असा आरोप करत मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे.