यादगिरी (कर्नाटक) : मुलगी जन्माला आल्याने सुरुवातीपासूनच संतापलेल्या (Anger of birth of girl ) बापाने आपल्या ९ महिन्यांच्या मुलीची हत्या (Father killed daughter) केल्याची अमानुष घटना कर्नाटक राज्यात येणाऱ्या यादगिरी जिल्ह्यातील बड्डेपल्ली गावात घडली आहे. latest news from Karnataka, Karnataka Crime
Father killed Daughter : मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच केली 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या - वडिलांकडून चिमुकलीची हत्या
मुलगी जन्माला आल्याच्या रागातून (Anger of birth of girl ) संतापलेल्या वडिलांनी 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या (Father killed daughter) केली. ही घटना कर्नाटक राज्यातील बड्डेपल्ली गावात घडली आहे. वडिलांनी मुलगी सतत रडते म्हणून रागाच्या भरात तिची दोरीने गळा आवळून हत्या केली. latest news from Karnataka, Karnataka Crime
पत्नीला कामावर पाठविले; अन्... :तनुश्री असे मृत मुलीचे तर रामू पल्लूर असे आरोपी वडिलांचे नाव आहे. रामू आणि सावित्री यांना ९ महिन्यांपूर्वी मुलगी झाली. रामू पल्लूर यांना मुलगी झाल्याचे दुःख झाले. मुलीचा सांभाळ करण्यासाठी त्यांची पत्नी चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच राहिली. 30 नोव्हेंबर रोजी पतीने पत्नीला मी घरी मुलीची काळजी घेईन, तू कामावर जा, असे सांगून कामावर पाठवले होते.
मद्यधुंद अवस्थेत मुलीची हत्या :पत्नी कामावर गेली असता घरी बाळ रडत असताना वडिलांनी मुलीच्या गळ्यात दोरीने बांधून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. एसपी डॉ सीबी वेदमूर्ती यांनी सांगितले की, आरोपीने मद्यधुंद अवस्थेत मुलीची हत्या केली आणि नंतर शेतात जाऊन पत्नीला याबाबत सांगितले. पत्नी सावित्रीने पतीविरुद्ध सैदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून कारवाई केली.