महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gave Bulldozer : नशीबवान जावाई; सासऱ्यांनी लग्नात दिला बुलडोझर भेट,कारण आहे खास - सासरांनी लग्नात दिला बुलडोझर भेट

हमीरपूरमध्ये राहणार्‍या योगी यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी लक्झरी कार नव्हे तर बुलडोझर भेट दिली आहे. हमीरपूरमध्ये वराला हुंडा म्हणून बुलडोझर मिळाली, ( Father In law Gave Bulldozer ) त्यामुळे त्याची दूरवर चर्चा होत आहे. (Hamirpur groom got bulldozer as dowry)

Gave Bulldozer
बुलडोझर भेट

By

Published : Dec 17, 2022, 1:33 PM IST

Updated : Dec 17, 2022, 2:07 PM IST

हमीरपूर :जिल्ह्यात एक अनोखा विवाह घडला आहे. बुलडोझरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशातील हमीपपूरमध्ये वराला वधू पित्याकडून हुंड्यामध्ये भेट म्हणून बुलडोझर दिला. यानंतर लग्न मंडपात उपस्थित पाहुण्यांनी योगी बाबा झिंदाबादच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे वर भारतीय नौदलात कार्यरत आहे. तर, वधूदेखील स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. लग्नाची भेट म्हणून वराला बुलडोझर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी कोणी बुलडोझर दिल्याची ही पहिलीच घटना आहे. (Hamirpur groom got bulldozer as dowry)

म्हणून बुलडोझर भेट :योगेंद्र योगी आणि नेहा प्रजापती यांच्या लग्नात भेट म्हणून मिळालेला बुलडोझर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मुलगी नेहाला भेट म्हणून 'कार' दिली असती, तर दारातच उभी राहिली असती, पण 'बुलडोझर दिल्याने तो अनेक कामांसाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. यातून उत्पन्नही सुरू होईल असे कारण वधूच्या वडिलांनी दिले आहे.

नेमका प्रकार काय?हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देवगाव येथील रहिवासी परशुराम प्रजापती भारतीय लष्करात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांची मुलगी नेहा प्रजापती हिचे लग्न भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या योगेंद्र यांच्यासोबत करण्याचे निश्चित केले. शुक्रवारी लग्नाचे इतर विधी आटोपल्यानंतर वधूच्या वडिलांनी वराला चक्क बुलडोझर गिफ्ट दिले. ही भेट पाहून वऱ्हडीदेखील आचंबित झाले. यावेळी उपस्थित काही वऱ्हाडींनी योगी बाबा जिंदाबादच्या घोषणा दिल्या. भेट म्हणून गाडी ऐवजी बुलडोझर चांगला असल्याचे आणि उपयोगी असल्याचे मत वऱ्हाडींनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 2:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details