महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Poisoning Daughter: लग्नापूर्वीच मुलाला जन्म देणाऱ्या 19 वर्षीय मुलीची वडिलांनी आणि मावशीने केली हत्या

रामवतलाई कालव्याच्या काठावर 5 डिसेंबर रोजी जन्मलेले नवजात अर्भक सापडले (Newborn baby found) आहे. जनतेने दिलेल्या माहितीच्या आधारे, जियापुरम पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जीवाशी लढणाऱ्या मुलाची सुटका (newborn baby saved) केली आणि त्याला उपचारासाठी त्रिची सरकारी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नवजात मुलाच्या मातेची तिच्या वडिलांनी आणि मावशीने विष पाजून हत्या (poisoning daughter to death) करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Poisoning Daughter
मुलीची हत्या

By

Published : Dec 16, 2022, 7:09 PM IST

त्रिची (तामिळनाडू) :तामिळनाडून एका 19 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला त्रिची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि तिने कबुलीजबाब देण्याचा निर्णय घेतला. त्याआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन महिलेकडून जबाब नोंदविला. यानंतर रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. महिलेने विवाहपूर्व एका बाळाला जन्म (Newborn baby found) दिला होता. यामुळे तिच्या वडिलांनी आणि मावशीने तिला जबरदस्तीने विष (poisoning daughter to death) पाजले. तिच्या बाळाला झुडुपात फेकून दिले. त्याला वाचविण्यात (newborn baby saved) पोलिसांना यश आले.

विवाहपूर्व मुलाच्या जन्माचा राग : महिलेचे म्हणणे आणि तपासाच्या आधारे काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्कोम्बू येथे सापडलेले मूल हे मृत महिलेचेच मूल असल्याचे समोर आले आहे. अविवाहित महिलेने मुलाला जन्म दिला. पालकांनी, हे कुटुंबासाठी लाजिरवाणे कृत्य समजून ते लपविण्यासाठी मुलीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी सांगितले की, मूल जन्माला आले तेव्हा त्यांना वाढवायचे. नव्हते म्हणून त्यांनी ते झुडपाजवळ फेकले.

मृत्यूपूर्व कबुलीमुळे सत्य बाहेर :कुटुंबीयांनी मुलाच्या आईची म्हणजेच १९ वर्षीय महिलेची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विषबाधा झालेल्या अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूपूर्व कबुलीमुळे सत्य बाहेर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महिलेचे वडील आणि मावशीला अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details