महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा फास्टॅग होणार बंद; लगेच करा 'हे' काम - रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन

FASTags without KYC will deactivated : जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी अपडेट केले नसेल, तर ते 31 जानेवारीपर्यंत करून घ्या. कारण, 31 जानेवारीनंतर बँकेकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेले फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे.

FASTags without KYC link to be deactivated after 31 january
31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag होणार बंद; लगेच करा 'हे' काम

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 11:51 AM IST

नवी दिल्ली FASTags without KYC will deactivated : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सोमवारी (15 जानेवारी) एक अधिसूचना जारी करत फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलंय. तसंच यामुळं फास्टॅग सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय प्रदान करता येईल, असंही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं म्हंटलंय.

एका वाहनात एकच फास्टॅग काम करेल :फास्टॅग वापरकर्त्यांना आता एका वाहनात फक्त एकच फास्टॅग वापरता येणार आहे. NHAI ने आपल्या निवेदनात म्हटलंय की, फास्टॅग वापरकर्त्यांना 'एक वाहन, एक फास्टॅग' धोरणाचं पालन करावं लागेल. यापूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग त्यांच्या संबंधित बँकांना परत करावे लागतील. आता फक्त नवीन फास्टॅग खाती सक्रिय राहतील.

...त्यामुळे NHAI नं उचललं हे पाऊल :इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी NHAI ने 'एक वाहन, एक फास्टॅग' मोहीम सुरू केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी NHAI कडे एकाच वाहनावर अनेक फास्टॅग जारी केले आहेत. मात्र, केवायसीदेखील करण्यात आलेले नाही, अशी तक्रार आली होती. तसंच अनेकवेळा वाहनाच्या विंडस्क्रीनवर FASTag जाणीवपूर्वक योग्य प्रकारे लावले जात नसल्याचंही समोर आलं. त्यामुळंच NHAI ने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

फास्टॅग म्हणजे काय? : 'फास्टॅग' हा टॅग किंवा स्टिकरचा एक प्रकार आहे. हे वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावले जाते. फास्टॅग 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन' किंवा 'आरएफआयडी' तंत्रज्ञानावर काम करते. या तंत्रज्ञानाद्वारे, टोल प्लाझावर बसवलेले कॅमेरे स्टिकरचा बार-कोड स्कॅन करतात. टोल फी आपोआप फास्टॅग वॉलेटमधून कापली जाते. फास्टॅग वापरल्याने वाहनचालकांना टोल टॅक्स भरण्यासाठी थांबावं लागत नाही. याचा वापर टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी केला जातो.

'या' प्लॅटफॉर्मवरून करा फास्टॅग खरेदी :तुम्ही देशातील कोणत्याही टोल प्लाझावरून फास्टॅग खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही ते अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँकेच्या शाखांमधून देखील खरेदी करू शकता. पेटीएम, अ‍ॅमेझॉन, गुगल पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून फास्टॅग खरेदी करूनही पेमेंट करता येऊ शकते. तसंच हवं असल्यास तुम्ही तुमचे बँक खाते या अ‍ॅपशी लिंक करू शकता. यासह, जेव्हाही तुम्ही कोणत्याही टोल प्लाझातून जाल, तेव्हा तुमच्या खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. दरम्यान, फास्टॅग खरेदी करताना तुमच्याकडे ओळखपत्र आणि वाहन नोंदणीचे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

हेही वाचा -

  1. 'त्या' चुकीनं ही वेळ आली, राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिला महत्त्वाचा सल्ला
  2. गेल्या वेळेपेक्षा जास्त सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  3. मुंबईत ईडीचे छापे, अखिलेश यादव सरकारमधील माजी मंत्र्यांच्या फ्लॅट्सवर आणणार जप्ती

ABOUT THE AUTHOR

...view details