जम्मू - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू खाश्मीरमध्ये पोहोचणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू ते लखनपूर असा बसने खडतर प्रवास केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे अनेक नेत्यांनीदेखील बसने प्रवास केला आहे. याबाबतचे फोटो आता समोर आले आहेत.
फारुख अब्दुल्लांचा बसमधून प्रवास भारत जोडो यात्रा उद्यापासून जम्मू काश्मीरमध्ये :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्यापासून जम्मू काश्मीरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह जम्मूत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे उत्सुक असून त्यांनी भारत जोडोची यात्रेची जय्यत तयारीही केली आहे.
जम्मू ते लखनपूर केला बसमधून प्रवास :राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उद्यापासून जम्मूमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला हे आपल्या लवाजम्यासह जम्मू ते लखनपूरपर्यंत बसने प्रवास केला आहे. जम्मू ते लखनपूर हा खडतर प्रवास त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत केला. त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या उत्सुकतेबाबत अंदाज लावला जाऊ शकतो.
फारूख अब्दुल्ला झाले होते भारत जोडो यात्रेत सहभागी :दिल्लीतील काश्मीर गेटजवळून यात्रा 3 जानेवारीला निघाली होती. ती यात्रा उत्तर प्रदेशातील लोणी या गाझियाबादजवळील गावात पोहोचली होती. काश्मीर गेटवरुन यात्रा निघत असताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी यात्रेत सहभागी होत काँग्रेसनेते राहुल गांधी यांची गळाभेटही घेतली होती. या गळाभेटीचा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओवर प्रेमाने आम्ही जग जिंकू, आम्ही देशाला जोडण्यासाठी निघालो आहोत. देशाला जोडून दाखवू असेही व्हिडिओवर लिहिले होते.
संजय राऊत होणार यात्रेत सहभागी :राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा कन्याकुमारीवरुन सुरू झाली आहे. ही यात्रा उद्या जम्मू काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. त्यासाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू ते लखनपूर बसने प्रवास केला. उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे 21 जानेवारीला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बारत जोडो यात्रेस सहभागी होणार असल्याचे ट्विटही त्यांनी केले आहे.