महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार, ओमर अब्दुलांचा मार्ग मोकळा - नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार

फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत. अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या सहकार्‍यांना कळवला आहे. पक्षातील वरिष्ठ सहकार्‍यांचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही ते आपल्या निर्णयावर पुनर्विचार करणार नाहीत यावर ते ठाम होते, असे एनसीचे प्रवक्ते इम्रान नबी यांनी सांगितले. (Farooq Abdullah steps down as NC president).

Farooq Abdullah
Farooq Abdullah

By

Published : Nov 18, 2022, 5:30 PM IST

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. (Farooq Abdullah steps down as NC president). त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांना आता पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाचे संरक्षक शेख मुहम्मद अब्दुल्ला यांच्या हजरतबल, श्रीनगर येथील स्मशानभूमीत ५ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याचे पक्षाने सांगितले आहे.

ओमर अब्दुल्ला पक्षाची सुत्रे घेण्याची शक्यता - श्रीनगरचे ९० वर्षीय खासदार डॉ फारूख अब्दुल्ला यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत. अब्दुल्ला यांनी जेकेएनसीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या सहकार्‍यांना कळवला आहे. पक्षातील वरिष्ठ सहकार्‍यांचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही ते आपल्या निर्णयावर पुनर्विचार करणार नाहीत यावर ते ठाम होते, असे एनसीचे प्रवक्ते इम्रान नबी यांनी सांगितले. दार यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे सरचिटणीस अली मुहम्मद सागर यांना पक्षाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. निवडणूक 5 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. तोपर्यंत डॉ. साहेब अध्यक्षपदी कायम राहतील. फारुख यांचा मुलगा आणि एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची पक्षाध्यक्षपदासाठी एकमताने निवड होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आत्तापर्यंत पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यास उमेदवारी दाखल केलेली नाही.

केंद्रात मंत्री देखील होते - फारूख अब्दुल्ला यांनी 1981 मध्ये सर्वप्रथम पक्षाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी त्यांचे वडील शेख अब्दुल्ला यांच्याकडून पक्षाचे सुत्रे घेतली होती. याला अपवाद म्हणजे 2002 ते 2009 हा काळ. या काळात ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सात वर्षांसाठी परराष्ट्र राज्यमंत्री होते. 2002 मध्ये फारुख यांनी त्यांचा मुलगा ओमर यांची पक्षाध्यक्षापदी नियुक्ती केली होती. ओमर यांनी 2009 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर जानेवारी 2009 मध्ये फारुख अब्दुल्ला यांची पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून आजतागायत ते पक्षाचे अध्यक्ष होते.

गेल्या काही वर्षात पक्षाची घसरण - म्हातारपण आणि नाजूक तब्येत असूनही फारुक राजकारणात सक्रिय आहेत. ते जम्मू-काश्मीरमधील कार्यकर्त्यांच्या सतत बैठकी घेत आहेत. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, कलम 370 रद्द केल्यानंतर फारुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी सर्व 20 जिल्ह्यांचा दौरा केला होता. राजकीय विश्लेषक म्हणतात की, 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीर खोऱ्यातील राजकीय पोकळी लक्षात घेता ओमर त्यांच्या पक्षासाठी मोठी भूमिका बजावू शकतात. काश्मीर खोर्‍यात पीडीपी आणि जम्मू प्रदेशात भाजपचा उदय झाल्यापासून नॅशनल कॉन्फरन्सला घसरणीचा सामना करावा लागतो आहे. ऑगस्ट 2019 नंतर पीडीपीच्या बहुसंख्य ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचीही घसरण झाली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी जर आपल्या वडिलांच्या पायावर पाऊल ठेवले तर ते त्यांची राजकीय जागा घेवू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details