महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आमचा देश महात्मा गांधींचा, भाजपाचा नाही' - फारुक अब्दुल्ला

काश्मिरी पंडिताना परत आणण्याचे आश्वासने गेल्या 28 वर्षांपासून देण्यात येत आहेत. भाजपाच्या सत्तेला पाच वर्ष पूर्ण झाले. आता दुसरे पाच वर्षही लवकरच पूर्ण होतील. त्या दिवसाची काश्मिरी पंडित अद्याप वाट पाहत आहेत, असे अब्दुला म्हणाले.

फारुक अब्दुल्ला
फारुक अब्दुल्ला

By

Published : Nov 6, 2020, 7:53 PM IST

श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मूमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. जर जम्मू काश्मीरला पाकिस्तानात सामिल व्हायचं असतं, तर ते 1947मध्ये पाकिस्तानात सामिल झालं असतं आणि हे कोणीच थांबऊ शकलं नसतं. आमचा देश महात्मा गांधींचा आहे, भाजपचा नाही, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले.

काश्मिरी पंडिताना परत आणण्याचे आश्वासने गेल्या 28 वर्षांपासून देण्यात येत आहेत. भाजपाच्या सत्तेला पाच वर्ष पूर्ण झाले. आता दुसरे पाच वर्षही लवकरच पूर्ण होतील. त्या दिवसाची काश्मिरी पंडित अद्याप वाट पाहत आहेत, असे अब्दुला म्हणाले. तसेच ओमर अब्दुल्ला यांनीही केंद्र सरकावर टीका केली. जम्मू काश्मीरमध्ये विकास पाहायला मिळत नाहीये. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे, हे केंद्र सरकारचे सर्वांत चुकीचे पाऊल होते, असे ते म्हणाले.

पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन -

15 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक पार पडली. काश्मीरला पुन्हा कलम 370चा दर्जा परत मिळावा, यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मिळून 'पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या पक्षांची स्थापन केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details