महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Use of horses for farming : बैलचं नाही मिळाले! मग काय?, घोडेचं जुंपले औताला - Use of horses for farming In Washim District

शेतकऱ्यांच्या काही भन्नाटच कल्पना असतात. शेकडो बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या वा पाहल्या असतीलच. मात्र, ही बातमी जरा हटके आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैल जोडी मिळत नाही. (farming In Washim District) त्यामुळे ट्रॅक्टरच्या मशागत कराही लागते. मात्र, त्याचे दर परवडत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर वाशीम तालुक्यातील शेलगांव घुगे येथील एका शेतकऱ्याने चक्क घोड्यालाच औताला जुंपले अन् मशागतीचे काम केले पुर्ण.

शेतीच्या मशागतीसाठी घोड्यांचा वापर
शेतीच्या मशागतीसाठी घोड्यांचा वापर

By

Published : Apr 5, 2022, 12:13 PM IST

वाशिम - शेतकरी काय करेल याचा काही नेम नाही. शेतकऱ्यांच्या काही भन्नाटच कल्पना असतात. शेकडो बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या वा पाहल्या असतीलच. मात्र, ही बातमी जरा हटके आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैल जोडी मिळत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या मशागत कराही लागते. मात्र, त्याचे दर परवडत नाहीत. (Use Horses For Farming In Washim District) त्या पार्श्वभूमीवर वाशीम तालुक्यातील शेलगांव घुगे येथील एका शेतकऱ्याने चक्क घोड्यालाच औताला जुंपले अन् मशागतीचे काम केले पुर्ण.

माहिती देताना शेतकरी

शेतात ये-जा करण्यासाठी घोड्यांचा वापर - बैल आणि ट्रॅक्टर परवडत नाहीत. मग घोडे कसे कामाला लावले असा प्रश्न तुम्हाला आपसुकच पडला असणार. तर, केवळ मुलांच्या हट्टापायी काही वर्षांपूर्वी शेलगांव घुगे येथील भाऊराव सुर्यभान धनगर यांनी राजा नावाचा एक लहान घोडा खरेदी केला. कालंतराने राजाला जोड असावा म्हणून तुळशा नावाचा दुसरा एक घोडा खरेदी करून गावांपासून तीन किमी अंतरावर असलेल्या शेतात ये-जा करण्यासाठी घोड्यांचा वापर सुरू केला. विशेष म्हणजे राजा आणि तुळशा असे नामकरणही भाऊराव यांनी स्वतःच केले.

घोड्यावर शेती करण्याचा प्रयोग - आपल्या आपल्या मुलांप्रमाणेच या घोड्यांची काळजी घेतात. लग्नाच्या वरातीत नाचवण्यासाठीही या घोडयांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न भाऊराव यांनी केला. मात्र घोडे काही नाचलेच नाही. घोडा हा पाळीव प्राणी कामात सक्रिय राहल्यास त्याचे आरोग्य उत्तम राहते असे भाऊराव ऐकून होते. देशातील डोंगराळ भागात शेती आणि तत्सम कामासाठी तेथील शेतकरी घोड्याचा किंवा खेचराचा वापर करतात. नेमकी हीच बाब हेरून वाशीम जिल्हयातील या शेतकऱ्याने घोड्यावर शेती करण्याचा प्रयोग सुरू केला आणि थेट राजा आणि तुळशशाच्या घोड जोडीला त्यांनी औतालाच जुंपले.

घोड जोडींनी अलीकडे काम केले - सुरूवातीला बैलांप्रमाणे घोड्यांना वळण लावण्याचे काम केले. आता राजा आणि तुळशा हे दोन्हीही घोडे शेतात वखरणी, कोळपणी ईत्यादी मशागतीचे काम जलद गतीने करीत आहेत. विशेष म्हणजे याच घोड्यावरून शेतात ये-जा आणि किरकोळ शेती साहित्याची वाहतूक हा शेतकरी करतो. शेताची वखरणी, उन्हाळी सोयाबीन आणि भुइमूग पिकाच्या कोळपणीसाठीही बैलांपेक्षा दुप्पट गतीने या घोड जोडींनी अलीकडे काम केले आहे. आगामी खरीप हंगामातही याच घोड्याने शेतीची मशागत करण्याचा त्यांचा मानस आहे.

शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत - बैल जोडी घेणे परवडत नाही. त्यामुळे केवळ शोक म्हणून पाळलेल्या घोड्यांना काहीतरी काम असावे म्हणून भाऊराव धनगर यांनी आपल्या राजा आणि तुळशा नावाच्या घोड्यांना प्रशिक्षण दिले आहे. बैलांप्रमाणेच हे घोडे शेतकऱ्याला प्रतिसाद देत आहेत. दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि संकल्पना उदयास येत आहेत. बैलजोडीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मात्र, ग्रामीण भागात अजुनही काही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत. तसेच, ट्रॅक्टरचे भाव परवडत नसल्यामुळे भाऊराव धनगर यांनी पाळलेल्या घोड्यांना थेट औताला जुंपून नवा प्रयोग केला आहे.

हेही वाचा -उपग्रहाचा चौथा अवशेष आढळला; असोलामेंढा येथे आढळला धातूचा गोळा

ABOUT THE AUTHOR

...view details