कोझिकोड (केरळ) -व्हिएतनाममधील स्वर्गीय फळ म्हणून ओळखले जाणारे गॅक फळ ( Gac Fruit Farming ) आता केरळमधील शेतकऱ्यांमधील एका शेतकऱ्यांनी पिकवाय सुरुवात केली आहे. प्रायोगिक स्वरुपात त्यांनी या फळाची शेती केली आहे. हे फळ व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंड यांसारख्या देशांमध्ये सामान्यतः पिकवले जाते. मात्र असे असले तरी केरळमधील अनेक शेतकऱ्यांनी या विदेशी फळाची यशस्वीपणे लागवड केली आहे. जे बीटा कॅरोटीन आणि ओमेगा 6 आणि 3 फॅटी ऍसिडचा खूप चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे या फळाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
असा आहे गॅक फळ -कासारगोड, कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गॅक लागवडीतील यशोगाथा आता पुढे येत आहेत. पिकल्यानंतर चार रंग बदलणारे हे फळ व्हिएतनाम आणि चीनमध्ये पारंपारिक औषधांमध्येही वापरले जाते. गॅक फळ खरबूज कुटुंबातील आहे आणि त्याच्या बाहेरील थरावर लहान मणके असतात. जेव्हा त्याचा रंग चमकदार लाल रंगात बदलतो, तेव्हा फळ काढण्याची वेळ येते. तर कच्च्या वेळी त्याचा भाजी म्हणूनही उपयोग होतो.