बक्सर (बिहार) : बिहारच्या बक्सरमधील चौसा ब्लॉक बनारपूर येथील शेतकरी स्थानिक पोलिसांच्या क्रूरतेमुळे संतापले आहेत. भरपाईच्या मागणीसाठी पोलिसांनी काल रात्री 12 वाजता आंदोलक शेतकऱ्यांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली होती. यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संतप्त पवित्रा घेत पोलिस वाहनासह एसजेव्हीएनचे गेट पेटवून दिले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत सुमारे 6 राऊंड गोळीबार केला. आता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू आहे.
शेतकर्यांची मागणी काय आहे? : शेतकर्यांनी सांगितले की त्यांची जमीन औष्णिक वीज प्रकल्पाच्या जमिनीच्या वादासाठी चौसा येथील एसजेव्हीएनने 2010-11 पूर्वीच संपादित केली होती. त्यावेळी त्यांना 2010-11 नुसार नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा शेतकऱ्यांनी चालू दरानुसार जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली. तो मोबदला देण्यास कंपनी तयार नाही. याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलकांच्या घरात घुसून महिला, पुरुष आणि लहान मुलांवर लाठीमार केला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.