नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज (शुक्रवार) पहाटे ३ पासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.
आंदोलन स्थळे खाली करा - उत्तर प्रदेश पोलीस
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. काल (गुरूवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला होता. तसेच आंदोलनस्थळी पोलिसांनी 'फ्लॅग मार्च' काढला होता. कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टमध्ये सर्व सामान भरून काही शेतकरी परत गावाकडे निघाले होते. मात्र, आज पहाटे पुन्हा शेतकरी ट्रक्समधून माघारी येण्यास सुरूवात झाली आहे.