नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील याचिकांवर सुनावणी करताना, या कायद्यांना स्थगिती दिली होती. त्याचवेळी न्यायालयाने हा वाद मिटवण्यासाठी एका समितीचीही नेमणूक केली होती. पाहूयात या समितीमधील तज्ज्ञांची ओळख..
डॉ. प्रमोद कुमार जोशी; कृषी-अर्थतज्ज्ञ
कृषी संशोधन क्षेत्रामध्ये जोशी यांचे नाव मोठे नाव आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.
हैदराबादमध्ये असलेल्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीचे; तसेच, दिल्लीमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पिके संशोधन संस्थेच्या हैदराबाद येथील कार्यालयात त्यांनी वरिष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे.
जोशी यांनी तंत्रज्ञान धोरण, बाजार आणि संस्थाशास्त्र या विषयांमध्ये संशोधन केले आहे. तसेच, त्यांना आतापर्यंत अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. यांमध्ये राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीच्या डॉ. एम. एस. रंधावा स्मृती पुरस्काराचाही समावेश आहे.
उत्तराखंडच्या अलमोरा गावात जन्मलेल्या जोशींनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पंतनगरच्या जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
अनिल घनवट; अध्यक्ष, शेतकरी संघटना
घनवट हे महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. शेतकरी नेते शरद जोशींनी या संघटनेची स्थापना केली होती. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या शेतकरी संघटनांमध्ये ही शेतकरी संघटना आघाडीवर आहे.
केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे घोषित करणारी ही पहिली शेतकरी संघटना होती. गेल्याच महिन्यात त्यांनी बीकेयू (मान) सोबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेत, आपला कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते.
प्राध्यापक अशोक गुलाटी; कृषी-अर्थतज्ज्ञ