गृह मंत्रालयाने परिस्थिती पाहता, सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
चक्का जाम आंदोलन : दिल्लीसह उत्तर भारतात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
16:17 February 06
इंटरनेट सेवा बंद
16:16 February 06
कर्नाटक : राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम
शेतकरी संघटनांनाद्वारे आज देशभरात चक्का जाम करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बनकापूर टोलनाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम केला.
16:16 February 06
राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टिमेटम
सरकारने कृषी कायदे रद्द करावे आणि एमएसपीवर कायदा तयार करावा. नाहीतर आंदोलन असेच सुरू राहिल, असे राकेश टिकैत म्हणाले.
16:15 February 06
अप्रिय घटना घडल्यास दंड देणार - राकेश टिकैत
गाजीपूर सीमेवर शांततेत चक्का जाम करण्यात येत आहे. काही अप्रिय घटना घडल्यास दंड देण्यात येणार असल्याचे भारतीय किसान शेतकरी संघटनेचे प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले.
13:30 February 06
हरयाणात आंदोलनाला मोठा प्रतिसाद
हरयाणातील पलवल येथे चक्का जाम आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्ली हरयाणा महामार्गावर जमले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलक शेतकऱयांनी केली आहे.
12:50 February 06
बंगळुरू शहराबाहेरील विमानतळावर शेतकऱ्यांचा चक्का जाम
कर्नाटकातील एलहांका विमानतळाबाहेर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. या विमानतळावर 'एरो शो' आयोजित करण्यात आला होता. काल (शुक्रवार) तीन दिवसांचे प्रदर्शन समाप्त झाले. पोलिसांनी यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
12:37 February 06
नाशिकमध्ये आंदोलन
नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
12:27 February 06
नाशिक आणि पुण्यात शेतकरी उतरले रस्त्यावर
नाशिक आणि पुण्यात केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज संयुक्त किसान मोर्चाने चक्का जाम आंदोलनाची घोषणा दिली आहे. त्यानुसार दुपारी १२ ते ३ या वेळात आंदोलन होणार आहे.
12:15 February 06
आज देशभरात चक्का जाम
11:46 February 06
लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
10:52 February 06
लाल किल्ल्याकडे जाणारे मार्ग बंद
जामा मशीद, जनपथ, केंद्रीय सचिवालय, लाल किल्ल्यासह महत्त्वाच्या ठिकाणांकडे जाणारे आणि येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत.
10:50 February 06
दिल्लीच्या सर्व सीमा बंद
आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीतील सर्व एन्ट्री पाँईन्ट बंद केले आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिसांचारानंतर पोलिसांकडून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात आंदोलन होणार नसल्याचे आंदोलकांनी जाहीर केले असले तरीही पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
10:43 February 06
दिल्लीच्या चहू बाजूच्या सीमांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
सिंघू, टीकरी, गाझीपूरसह सर्व सीमांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे ५० हजार सुरक्षादलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी हिंचासार झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. शीघ्र कृती दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
10:37 February 06
चक्का जाम आंदोलन
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुमारे अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अद्याप यावर तोडगा निघाला नाही. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज देशव्यापी चक्का जामची घोषणा केली आहे. राजधानी दिल्ली क्षेत्रात आंदोलन करणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली वगळून देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळात हे आंदोलन होणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि स्कूल बसेसला यातून वगळण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत राजाने स्वतःच किलेबंदी केली आहे. तिथे आपल्याला जाम करण्याची गरज नाही. दिल्ली वगळता देशभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असे राकेश टिकैत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून पाणी आणि अन्न दिले जाईल. तसेच सरकार आमच्यासोबत काय करीत आहे हे त्यांना समजावून सांगू असे टिकैत म्हणाले.