महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : पैलवानांनी धैर्य ठेवावे, खाप पंचायत पैलवानांच्या न्यायासाठी लढेल लढाई - नरेश टिकैत

भाजप खासदार तथा भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता कुस्तीपटूंच्या समर्थनात खाप पंचायत आली असून भारतीय किसान युनियननेही पैलवानांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : May 31, 2023, 12:26 PM IST

लखनौ :भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर कुस्तपटूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत अर्पण करण्याचा निर्धार केल्यानंतर भारतीय किसान युनियन कुस्तीपटूंच्या समर्थनात पुढे आली आहे. पैलवानांनी धैर्य ठेवावे, असे आवाहन भारतीय कुसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केले आहे. खाप पंचायत आणि भारतीय किसान युनियन पैलवानांच्या न्यायासाठी लढाई लढणार असल्याचे नरेश टिकैत यांनी यावेळी जाहीर केले आहे.

भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी काढली समजूत :कुस्तीपटूंनी गंगा नदीत आपली पदके अर्पण करण्याचा निर्धार केल्यानंतर विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, बबिता फोगट हे हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र भारतीय किसान युनियनने समजूत काढल्यानंतर हे सगळे पैलवान परतले आहेत. रात्री उशिरा मुझफ्फरनगर येथील टिकैत यांच्या घरी पैलवान पोहोचले. रात्रीचे जेवण करून तेथेच पैलवानांनी रात्री विश्रांती घेतली. त्यानंतर वाटेत येताना शिव चौकात पैलवानांनी पूजा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

खाप पंचायती लढणार कुस्तीपटूंची लढाई :भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंची समजूत काढून सर्व खाप पंचायती कुस्तीपटूंची लढाई जोरदारपणे लढतील असे स्पष्ट केले. पैलवानांना न्याय मिळाल्यानंतरच खाप पंचायती शांत होतील असे आश्वासनही यावेळी नरेश टिकैत यांनी पैलवानांना दिले आहे. राकेश टिकैत यांनी पाच दिवसात मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून त्यावर पैलवानांचे एकमत झाले आहे. खाप पंचायतींना बोलावण्यात आले असून त्यामध्ये पुढील रणनीती आखली जाईल. पैलवानांची पदके नदीत अर्पण करु नयेत असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटूंनी त्यांची पदके भारतीय किसान युनियनचे प्रमुख टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

गुरुवारी होणार खाप पंचायत :भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी खाप नेत्यांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलावल्याचे नरेश टिकैत यांनी सांगितले. टिकैत म्हणाले की, आमच्या मुलींवर अत्याचार होत असून संपूर्ण देश संतप्त आहे. सरकार एका माणसाला वाचवत असल्याचा आरोपही नरेश टिकैत यांच्याकडून करण्यात आला आहे. आतापर्यंत शासनाकडून कोणीही पैलवानांशी बोलायला आलेले नाही. शांततापूर्ण आंदोलन करणे चुकीचे नाही. आम्ही त्यांना निराश करणार नसून कुस्ती परिषदेच्या अध्यक्ष WFI President ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीबाबत भविष्यातील कृतीवर चर्चा करण्यासाठी आम्ही खाप बैठक बोलावल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -

  1. Wrestlers Protest : पदक गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय मागे, सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टिमेटम
  2. Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल
  3. Wrestlers Protest : तर गंगेत आपली पदकांचे करणार अर्पण, कुस्तीपटूंचा निर्धार; दिल्लीगेटवर करणार प्राणांतिक आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details