नवी दिल्ली -भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एका व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलीस नियंत्रण कक्षात आला फोन -
कमला नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन करून राकेश टिकैत यांना गोळी घालून मारणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हा फोन ट्रेस करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास लावला. धमकी देणारा व्यक्ती एक चहा विक्रेता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.