महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिंघू बॉर्डरवर विष घेऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - सिंघु बॉर्डर शेतकरी आत्महत्या न्यूज

शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

सिंघू बॉर्डरवर विष घेऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सिंघू बॉर्डरवर विष घेऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Dec 21, 2020, 4:02 PM IST

नवी दिल्ली -केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी मागील 25 दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

निरंजन सिंह (वय 65) असे संबधित शेतकऱयाचे नाव असून ते पंजाबच्या वाशी तरनतारनमधील रहिवासी आहेत. निरंजन सिंह यांच्याकडे एक सुसाईड नोटही सापडली आहे. शेतकरी आपला जीव देतील. मात्र, आपल्या आई समान असलेली जमीन गमवण्याचे दु:ख सहन करणार नाहीत. जर सर्वच खाजगी क्षेत्रात गेल. तर आमच्या पिकांची कोण खरेदी करेल आणि केली तर त्याला योग्य भाव का देईल, असे त्यांनी सुसाईड नोट लिहलं आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवाीर शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण करण्यात आले. काही दिवसापूर्वीच संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. शेतकऱ्याचे दु:ख पाहिलं. जे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर बसले आहेत. हे पाहून मन खिन्न झालं, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलं होत.

आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू...

शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघात, आजार आणि थंडीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले. 40 मुख्य शेतकरी संघटना आणि सुमारे 500 इतर शेतकरी संघटनांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 24 दिवसांपासून बसून आहेत.

शेतकरी आंदोलनाचा आजचा 26वा दिवस -

आंदोलनाचा आज 26वा दिवस आहे. यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार केला आहे. यासोबतच 25 ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणाच्या सर्व महामार्गांवरील टोल वसूली करु देणार नसल्याचेही आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन लवकरात लवकर संपावे यासाठी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

काय आहेत कृषी कायदे?

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.

हेही वाचा -'राम मंदिराचे राजकारण संपवा; वर्गणी गोळा करणे म्हणजे कार सेवकांचा अपमान'

ABOUT THE AUTHOR

...view details