चैन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार होते. मात्र, त्यांनी राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रद्द केल्याने त्यांच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
मुरुगेसन असे त्या व्यक्तीचे नाव आहे. राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय रजनीकांत यांनी रद्द करावा, अशी त्यांची इच्छा आहे. गुरुवारी ही घटना घडली. मुरगेसन यांनी स्वतःला आग लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवत ताबडतोप रुग्णालयात दाखल केले.
रजनीकांतची राजकारणातून माघार -
रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार होते. त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली.