महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतातील 'या' ठिकाणी रावणदहन केले जात नाही, जाणून घ्या इतिहास

हिमाचल प्रदेशमधील बैजनाथ शहराला पर्यटन आणि धर्माचा वारसा लाभला आहे. येथे असलेले बैजनाथ मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा संबंध रावणाच्या तपस्येशीही जोडला जातो.

famous baijnath
famous baijnath

By

Published : Oct 15, 2021, 6:16 AM IST

बैजनाथ (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील बैजनाथ शहराला पर्यटन आणि धर्माचा वारसा लाभला आहे. येथे असलेले बैजनाथ मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा संबंध रावणाच्या तपस्येशीही जोडला जातो. दसऱ्याला देशभरात रावणदहनाचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या ४ दशकांपासून बैजनाथमध्ये दसरा साजरा करण्यात आलेला नाही. असे म्हणतात की रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येदरम्यान ९ वेळा आपला शिरच्छेद केला होता. तर, दहाव्यांदा तसे करताना महादेवाने प्रकट होऊन रावणाला अडवले. तेव्हा रावणाने महादेवाला वैद्यनाथ असे म्हटले होते.

हेही वाचा -Dussehra Special : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव; जाणून घ्या इतिहास

  • महादेवाने रावणाला दिले होते शिवलिंग -

इतर एका आख्यायिकेनुसार, रावणाला महादेवाकडून त्यांना लंकेला नेण्याचं वरदान प्राप्त होते. या वरदान स्वरुपात देवानं रावणाला एक शिवलिंग देऊन, तू याला पहिल्यांदा जिथं कुठं स्थापित करशील मी त्याच ठिकाणी राहणार असे सांगितले. यानंतर, रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला. दरम्यान, रस्त्यात लघुशंकेला जाताना त्याने एका मेंढपाळाजवळ ते शिवलिंग सोपवले. मात्र, शिवलिंगाचा भार जास्त असल्याने मेंढपाळाला ते सावरता आले नाही आणि त्याने शिवलिंग जमिनीवर ठेऊन दिले. रावण परतल्यानंतर त्याला शिवलिंग जमिनीवर ठेवलेले दिसले. त्याने शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, तो अशस्वी ठरला. देवानं सांगितल्यानुसार शिवलिंग तिथेच स्थापित झाले. बैजनाथ धाममध्ये असलेले शिवलिंग हे तेच शिवलिंग असल्याचे म्हटले जाते.

  • म्हणून येथे साजरा होत नाही दसरा -

४ दशकांपूर्वी येथेही मोठ्या उत्साहात दसऱ्याचे आयोजन केले जायचे. मात्र, एकदा उत्सवादरम्यान भीषण आग लागली आणि त्यात जनजीवन आणि मालमत्तेचे खूप नुकसान झाले होते. त्या घटनेनंतर येथे दसरा उत्सव आणि रावणदहन थांबवण्यात आले.

सतयुगापासून तर द्वापर युगापर्यंतच्या अनेक आख्यायिकांमुळे महादेवाच्या या बैजनाथ धामवर भाविकांची मोठी आस्था आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. शिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची विशेष गर्दी असते.

हेही वाचा -Dussehra 2021 : दसऱ्याच्या 'या' आहेत महत्त्वपूर्ण परंपरा

ABOUT THE AUTHOR

...view details