जयपूर - जगाचा निरोप घेताना महाराष्ट्राचा प्रशांत राजेंद्र शिंदे चार जणांना नवसंजीवनी देणार आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर राजेंद्रचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सवाई मानसिंग रुग्णालयात ( Organ Transplant in Jaipur ) सुरू करण्यात आली आहे. स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीकरजवळ झालेल्या अपघातात 36 वर्षीय राजेंद्र जखमी झाला होता. तो राजस्थानमध्ये तांत्रिक अभियंता म्हणून काम करत होता.
18 जून रोजी राजेंद्र यांना स्ट्रोकचा झटका आला, त्यामुळे त्यांना जयपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनतर्फे कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र शिंदे यांची पत्नी नयना आणि वडील राजेंद्र प्रसाद शिंदे यांनी अवयव दान करण्यास होकार दिला.
चार जणांना दिली नवसंजीवनी - डॉक्टरांनी उपचार करुन त्याला 23 जून रोजी ब्रेन डेड घोषित केले. नातेवाईकांचे स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनकडून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या संमतीनंतर ग्रीन कॉरिडोर बनवून त्यांचे हृदय आणि दोन किडन्याचे स्थलांतर हे SMS रुग्णालयाला देण्यात आले आहेत. तर यकृत हे महात्मा गांधी ( Organ Transplant in Jaipur ) रुग्णालयांना देण्यात येणार आहे. राजेंद्र यांचे हृदय आणि दोन्ही किडनी सवाई मानसिंग रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात येत आहे.