महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रचलं 'हे' कारस्थान

मुंबईमधील एका पठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक केले. ऐवढेच नाही तर त्याने थेट हरिद्वार पोलीस स्थानकात जाऊन सुरक्षारक्षकांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचे बिंग फुटले.

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रचलं 'हे' कारस्थान
fake-ips-officer-arrested-in-haridwar

By

Published : Oct 28, 2021, 8:38 AM IST

हरिद्वार - गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मुलं नेहमीच काहीतरी हटके शोधत असतात. अशाच मुंबईमधील एका पठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक केले. ऐवढेच नाही तर त्याने थेट हरिद्वार पोलीस स्थानकात जाऊन सुरक्षारक्षकांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचे बिंग फुटले. सागर वाघमारे असे त्या युवकाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साखर वाघमारे आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हरिद्वारला आला होता. यावेळी तीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने आयपीस अधिकारी असल्याचे सांगितले. यावेळी त्याने हरिद्वारमध्ये अनेक सरकारी व्यवस्थेचा फायदा घेतला. येथेच तो थांबला नाही. त्याने पोलीस स्थानक गाठत आपण 2018 या बॅचचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांकडे राहण्यासाठी गेस्ट हाऊसची आणि सुरक्षा रक्षकांची मागणी केली. मात्र, यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय पोलिसांना आला. यावेळी जिल्हा एसएसपी योगेंद्र रावत यांनी सीओ अभय प्रताप यांना ही माहिती दिली. यावेळी सीओ अभय प्रताप यांनी संबंधित तरुणाशी संवाद साधला. यावेळी तो खोटे बोलत असल्याचे प्रताप यांच्या लक्षात आले.

हरिद्वार पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित नावाची कोणतीच व्यक्ती 2018 च्या बॅचमध्ये नसल्याचे उघड झाले. तर संबंधित युवक हा अधिकारी नाही तर युपीएससीचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने आपण खोटे बोलल्याचे कबूल केले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा -Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details